HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही – सतेज पाटील

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीनंतर एकत्रही येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

कोल्हापूर महापालिका प्रस्ताविक आहे. मागील वर्षी महानगरपालिका निवडणुकीत विविध पक्षांमध्ये चुरस होती. स्वतंत्र निवडणूक लढणार असं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जाहीर केलं आहे. काँग्रेसही स्वतंत्र निवडणूक लढवेल, आम्ही आमचा निर्णय वरिष्ठांना कळवणार आहे. महाविकास आघाडी नक्की महापालिकेवर सत्ता स्थापन करेल, असं सतेज पाटील म्हणाले आहेत. महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अमृता फडणवीसांची ठाकरेंवर विखारी टीका”

News Desk

मराठा आरक्षण | स्वत: प्रकाश आंबेडकर कोल्हापुरात, मराठा मोर्चात होणार सहभागी

News Desk

झोपड्यांचे पुनर्वसन करताना मानवी दृष्टीकोन!  – जितेंद्र आव्हाड

Aprna