HW News Marathi
महाराष्ट्र

मी सोलापूर शहर मध्य मदरासंघातूनच निवडणूक लढणार | प्रणिती शिंदे

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. प्रणिती या सोलापूर शहर मध्यच्या आमदार असून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या आज (२९ जुलै) मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यात प्रणितींनी सोलापूर शहर मध्यमधून इच्छुक उमेदवारांचा अर्ज दाखल करून मुलाखत दिली आहे.

दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघता बहुसंख्य मुस्लिम असल्याने प्रणिती यांनी शहर मध्यची जागा मुस्लिम समाजाला सोडावी, मनाचा मोठेपणा दाखवावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक यु. न. बेरिया यांनी रविवारी (२८ जुलै) पत्रकार परिषदेत केली. प्रणित यांनी दोन वेळा या मदारसंघातून माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांना पराभूत करत केले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात आणखीनच वाढ!

News Desk

नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची १३ ऑगस्टला प्रसिद्धी

Aprna

दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

swarit