HW News Marathi
महाराष्ट्र

सोनिया गांधींकडून ‘महाशिवआघाडी’ला मिळाला हिरवा कंदील | सूत्र

नवी दिल्ली | राज्यातील सत्ता स्थापनेच्या तिढा सुटण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अखेर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाशिवाआघाडीला सरकार स्थापन होण्यात हिरवा कंदील मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी काँग्रेस-राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र, या बैठकीत पवार सहभागी होणार नाही. “शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज (२० नोव्हेंबर) किमान समान कार्यक्रम निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा २-३ दिवसात संपेल”, अशी माहिती शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. राष्ट्रवादीसोबत एकत्रित बैठकीआधी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यता आल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आदी नेते उपस्थिती आहेत. आज सकाळीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादीची आज होणारी बैठक ही शेवटची असेल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

Aprna

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

Aprna

मनसेच्या आजच्या बैठकीत राज ठाकरेंची सुनही उपस्थित

News Desk