HW News Marathi
देश / विदेश

विनायक मेटे फडणवीसांच्या इशाऱ्यावर जनतेची दिशाभूल करतायत !  

मुंबई | “मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण हे सर्वांना विश्वासात घेऊनच पावले उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या व मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे”, असे म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसंग्राम संघटनेच्या विनायक मेटे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, सचिन सावंत यांनी विनायक मेटेंसह भाजप नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे.

“आज मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती नाही. आता जे वकील आहेत ते देखील पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर जनतेची दिशाभूल करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा हा मराठा समाज चांगलाच ओळखून आहे”, अशी बोचरी टीका करत सचिन सावंत यांनी विनायक मेटेंसह राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सुनावले आहे. दरम्यान, आज (८ ऑगस्ट) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटे राज्य सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

“सर्वोच्च न्यालयात मराठा आरक्षणावर सुनावणी सुरू असताना महाविकासआघाडी सरकारला गांभीर्य नाही. यातून, सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नाकर्तेपणा दिसतो. आता मिळालेले आरक्षण जातंय की काय अशी शंका वाटते. या परिस्थिती अशोक चव्हाणांना पदावरून हटवावे. मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांकडून ती जबाबदारी काढून घ्यावी आणि एकनाथ शिंदे किंवा सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे”, अशी मागणी विनायक मेटे यांनी मराठा समन्वय समितीच्या बैठकीनंतर केली आहे. विनायक मेटेंच्या नेतृत्वात राज्यातील ९ मराठा संघटना एकत्र येऊन मराठा समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा!

News Desk

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपातीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती…!

News Desk

काँग्रेसचे अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ व्हायरल

News Desk