HW News Marathi
महाराष्ट्र

संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

मुंबई | संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या आपत्कालीन यंत्रणा कालपासून (२० जून) सक्रिय केल्या आहेत. यामध्ये कालपासून नदीपात्रात अग्निशामक विभागाच्या ९ यांत्रिक बोटी सक्रिय करण्यात आल्या आहेत. याचे प्रात्यक्षिक आणि तपासणी आज मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली.

गतवर्षीच्या महापुराचा अनुभव ध्यानात घेता यंदा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी वेळीच आपल्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज केल्या आहेत. यामध्ये यांत्रिक बोटी बरोबर, पुरबधितांसाठी तात्पुरता निवारा, जनावरांसाठी तात्पुरता निवारा आदींचे नियोजन पूर्ण केले आहे. याचबरोबर नदी काठच्या वस्त्यांना पाणी २५ फूट येताच लोकांनी स्वताहून स्थलांतरित होणेबाबतचे आवाहन केले जात आहे. याच अनुषंगाने आज सांगली महापालिकेच्या आणीबाणी सेवा विभागाकडील ९ यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक आणि साहित्याची माहिती काल आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली.

तसेच अग्निशामक विभागाच्या तयारीचा आढावाही घेतला. सांगलीच्या माई घाटावर हे यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, एस एस खरात, मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजीव सातव यांच्या निधनाने तरुण, कर्तृत्वान व उमदे नेतृत्व गमावले! – नाना पटोले

News Desk

निर्बूद्ध नागरिकंचा मोर्चा

News Desk

अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या विरुध्द केलेल्या वक्तव्यानंतर मनसे- सेनेत टीका टिप्पणी सुरू

swarit