HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल देशमुखांप्रमाणेच मलाही अडकवण्याचं षड्यंत्र” – नवाब मलिक

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून कोणते ना कोणते दावे-प्रतिदावे करत असतात. आणि आज देखील नवाब मलिक यांनी सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेत पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले.

माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली

पुढे बोलताना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय तपास यंत्रणांवरच हल्ला चढवला.मात्र, नेमकी कोणती केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्याविरोधात षडयंत्र रचत आहे हे नवाब मलिक यांच्याकडून अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. अनिल देशमुखांशी जो खेळ खेळण्यात आला. तोच खेळ माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याची माहिती मला मिळाली आहे. पुरावे आले आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे. मी त्याचीही माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहे

गेले 2 महिने मला काही लोकं माहिती देत होते की काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घरची आणि ऑफिसची माहिती घेत आहेत. माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात यावर देखील त्यांचं लक्ष आहे. मी दुबईला असताना दोन जण माझ्या घरचे फोटो काढत होते. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं आहे, असं मलिक या पत्रकारपरिषदे दरम्यान म्हणाले. या प्रकरणी आता मलिक हे पोलिसांना तक्रार देणार आहे आणि सीपी यांना देखील पत्र लिहिणार आहे.

आता मला फ्रेम करून दुसरे देशमुख करण्याचा डाव

इतकच नाही तर या प्रकरणाची मी अमित शहांकडे तक्रार करणार आहे. शहा यांना पत्रं लिहून तक्रार करणार आहे. मला अडकवण्याचा डाव करणार असाल तर मी घाबरणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर शहा काय कारवाई करतात हे पाहणार आहे. तसेच माझ्याविरोधात कुठे कुठे आणि किती तक्रारी करण्यात आल्या त्याची आरटीआयमधून माहिती घेणार आहे. राज्याच्या मंत्र्यांना फ्रेम करण्याचा हा मोठा डाव आहे. एक अनिल देशमुख झाले, आता मला फ्रेम करून दुसरे देशमुख करण्याचा डाव आहे, असा खळबळजनक दावाच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी केलाय. आता नवाब मलिक यांच्या नव्या दाव्यांना पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १० ते १३ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता !

News Desk

गणेशोत्सवाआधी अमृता फडणवीसांचं नवं गाणं होणार रिलीज!

News Desk

हुकमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय, दरेकरांचा राऊतांना टोला

News Desk