HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंकडून खास शुभेच्छा; परळीत 45 फुटांची प्रतिकृती

बीड। २२ जुलै ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस. लाडक्या नेत्याचा वाढदिवस कर्त्याकर्ते नेहमीच उत्साहात साजरा करतात आणि त्यासाठी कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ असते. परळीत देखील अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, एक एक खास फ्लेक्स झळकतो आहे.

45 फूट उंच अजित पवारांची प्रतिकृती

अजितदादा पवार हे अनेकांचे चहिते आहे. त्यांच्यावर असलेलं प्रेम त्यांचे समर्थक नेहमीच दाखवत असतात. त्यांच्या वाढदिवसानिम्मित खास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी शहरातील मुख्य चौक मानल्या जाणाऱ्या टॉवर चौकात, 45 फूट उंच अजित पवारांची प्रतिकृती साकारण्यात आलीय. शहरातील मुख्य ठिकाणी हे फ्लॅक्स झळकणार असून याला उभारण्यास 24 तासांचा अवधी लागतो आहे. खास परभणीहून हे फ्लॅक्स मागवण्यात आले आहेत. अजित पवारांच्या वाढदिवसाला दहा दिवसांचा अवधी असला तरी त्यापूर्वीच लावण्यात येत असलेले हे फ्लेक्स चांगलेच चर्चेत येत आहेत.

भाजप राष्ट्रवादी पुन्हा आमनेसामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळालं नसल्याने बीड मध्ये मुंडे समर्थक आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. असं तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आपल्या लाडक्या अजित दादांचा वाढदिवस

जोमाने साजरा करण्याच्या तयारीत आहेत. पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकां समोर येण्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही’; भाजपकडून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

News Desk

महाराष्ट्रामध्ये पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही, निलेश राणेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर 

News Desk

बुरा न मानो होली है… संजय राऊत यांचे सूचक ट्विट

News Desk