HW News Marathi
Covid-19

देशात ४५ हजारांच्या खाली आढळले नवे कोरोना रुग्ण!

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात अनेक महिन्यांनी ५० हजारांच्या घरात नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या दिवसात 42 हजार 640 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 167 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.

नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 167 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 81 हजार 839 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात 6,270 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 13,758 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 57,33,215 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,24,398 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.89% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown : ‘वंदे भारत’चा दुसरा टप्पा १६ ते २२ मे असणार

News Desk

पुण्यातील कोरोनाबाधितांवर आता प्लाझ्मा थेरपी अवलंबणार

News Desk

राज्यात आज तब्बल ८११ नवे कोरोनाबाधित, एकूण आकडा ७ हजारच्या पार

News Desk