HW News Marathi
Covid-19

देशातील कोरोना रुग्ण संख्या घटली!

नवी दिल्ली | भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत थोडी फार घट होताना दिसत आहे.भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे.
दरम्यान देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात सोमवारी ७१ हजार ७३६ रूग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९२ एवढे झाले आहे. याशिवाय सोमवारी राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात ५२४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला संबोधित करणार

News Desk

Pravin Darekar HW Exclusive : मी माझ्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणार आहे !

News Desk

धारावीमध्ये RSS स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला,चंद्रकांत पाटलांचा दावा…

News Desk