HW News Marathi
Covid-19

चिंताजनक! देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढले, २४ तासांत ४० हजारांच्या पुढे नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. मात्र, पुन्हा एकदा देशात रुग्ण संख्या काहीशी वाढताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार १५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर एका दिवसात ३ हजार ९९८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. काल हा आकडा अवघ्या ३७४ वर आला असताना, कोरोनाबळीत जवळपास दहापटीने वाढ झाली आहे. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. तर कालच्या दिवसात देशात ३६ हजार ९७७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात ६९१० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन ७५१० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६०,००,९११ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ९४,५९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.३३% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण महाराष्ट्रात तिसरी लाट येऊ द्यायची नाही – उद्धव ठाकरे

News Desk

चिंताजनक : राज्यात आज कोरोना रुग्णांचा उद्रेक!

News Desk

एक कोरोना रूग्ण सापडला तर बाजूची २० घरं सिल करणार,’या’ राज्याचा निर्णय!

News Desk