HW News Marathi
Covid-19

जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली

मुंबई | वृद्ध महिलेचा शौचालयात मृत्यू झाल्याप्रकरणानंतर जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीने डॉ. भास्कर खैरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. यानंतर आता शासनाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी केली आहे. या जागी आता सांगली येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

जळगावच्या जिल्हाधिकारी पदासाठी अभिजित राऊत यांच्या नावांची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली होती. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून ढाकणे यांनी नियुक्ती करण्यात आली होती. सोलापूर येथे पालिका आयुक्त असताना अतिक्रमन करुन बांधण्यात आलेला मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश दिले होते. यानंतर ढाकणे हे आक्रमक अधिकारी असल्याचे बोलले जात होते. मात्र, कोरोना काळात जळगावातील परिस्थिती हाताळताना अपयश ढाकणेंना आल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब ‘सामना’ हो गया, – भाजपची राऊतांवर टिका

Arati More

दिलासादायक ! राज्यात आज ३१ हजारांहून अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

राज्यात पुन्हा २४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले!

News Desk