HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

#CoronaVirus | राज्यात आज आणखी नव्या ११७ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात तासागणिक अधिकाधिक वाढ होताना पाहायला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ११७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ११३५ इतका झाला आहे. काल (७ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १००० पार गेल्याने राज्याची चिंता वाढलेली असताना आता त्यात आणखी भर पडली आहे. तर एकट्या पुण्यातील कोरोनारुग्णांच्या मृत्यूची संख्या १६ वर जाऊन पोहोचली आहे. फक्त गेल्या २४ तासांत एकट्या पुण्यात तब्बल ८ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहेत.

राज्यात नव्या ११७ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – 72
नवी मुंबई – 1
बुलढाणा – 1
पुणे – 36
अकोला – 1
ठाणे – 3
कल्याण-डोंबिवली – 1
पुणे ग्रामीण – 2

राज्यात अद्याप ‘कोरोना’च्या तिसऱ्या स्टेजला सुरुवात नाही !

देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून आणि विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असले तरीही कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा चिंता वाढवत आहे. मात्र, असे असले तरीही देशात तसेच राज्यात अजूनही ‘कोरोना’च्या तिसऱ्या स्टेजला सुरुवात झालेली नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज (८ एप्रिल) स्पष्ट केले आहे. थोड्याच वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. देशासाठी सद्यस्थिती हि अत्यंत दिलासादायक बाब आहे. तसेच आपल्याला हा संसर्ग इथेच रोखणेही तितकेच आवश्यक आहे.

Related posts

१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल गानी तुर्क यांचा मृत्यू

News Desk

गोरेगावात १५ गाळ्याना आग

News Desk

देशात गेल्या २४ तासात ६७६७ रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, तर १४७ जणांचा मृत्यू

News Desk