HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांच्या घरात नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 50 हजार 848 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 358 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 50,848

देशात 24 तासात डिस्चार्ज – 68,817

देशात 24 तासात मृत्यू – 1,358

एकूण रूग्ण – 3,00,28,709

एकूण डिस्चार्ज – 2,89,94,855

एकूण मृत्यू – 3,90,660

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 6,43,194

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 29,46,39,511

एका दिवसातील लसीकरण – 54,24,374

रिकव्हरी दर – 96.56%

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात लाँकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ९५ हजारपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद

News Desk

सावधान! कोरोनाचा पीक अजून बाकी, AIIMS चे संचालक रणदीप गुलेरीयांचा गंभीर इशारा

News Desk

राज्यात आज कोरोना २,४८७ नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू

News Desk