HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध? उद्धव ठाकरे जनतेला आज संबोधित करणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२ एप्रिल) जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे कशावर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संध्याकाळी ८.३० वाजता वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. त्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आज वर्षावर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत त्यानंतर ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता. आता वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, अशा जिल्ह्यांचाही आढावा घेतला जाणार असून त्या जिल्ह्यांसाठी काही विशेष उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान,राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सरकारने निर्बंध लावून देखील नागरिक कोरोना नियम मोडतांना दिसत आहे. राज्यात अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच, पुण्यात लॉकडाऊन लागणार नसल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत सांगितली आहे.

राज्यात ४३,१८३ नवे रुग्ण, २४९ जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ४३,१८३ नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८,६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३,६६,५३३ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना

News Desk

आता परप्रांतीयांकडून मेडिकल सर्टिफिकेट नाही, प्रवासाआधी होणार विनाशुल्क मेडिकल चेकअप

News Desk

मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत पालिकेकडून सुधारित नियमावली जाहीर

News Desk