HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही !

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट दुप्पट होण्याचा वेग मंदावला. हा कालावधी सात दिवसांवर होता. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत करोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. त्यामुळे राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर देखील ७ वरून सरासरी ५ वर आला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी ३ समित्या नेमल्या आहेत, असेही टोपेंनी सांगितले.

राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असा दिलासा देतानाच मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राजेश टोपेंनी काल (२२ एप्रिल) फेसबुक लाईव्हीद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.

महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. आज ७११२ चाचण्या केल्या. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे. हा जो सात दिवसांचा कालावधी आहे तो अजून वाढविण्याचा उद्देश आहे.राज्यात दररोज १३ टक्के लोक बरे होऊन घरी जात आहेत. हे आशादायी चित्र आहे. केवळ एक टक्के रुग्ण अत्यवस्थ आहेत. ८३ टक्के लोकांना लक्षणे नाही तर १७ टक्के लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात, कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

News Desk

महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवण्याच्या गृहमंत्र्यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद

News Desk

मुंबईतल्या गर्दीवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज, निर्बंध आणखी कडक करण्याचा दिला इशारा

News Desk