HW News Marathi
Covid-19

बीडच्या केजमधील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा आज औरंगाबादेत मृत्यू

बीड | किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाल्यानंतर औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झालेल्या केज तालुक्यातील माळेगाव येथील ६० वर्षीय महिलेचा आज (१६ जून) मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. संबंधित महिलेवर गेल्या महिन्यात किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ३ जूनला या महिलेने रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी परतल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने केजच्या खासगी रुग्णालयात त्या महिलेला नातेवाईकांनी दाखल केले. परंतु, तिथे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १० जून रोजी पुन्हा त्या महिलेला औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात भर्ती केले गेले होते.

औरंगाबादमधील या खासगी रुग्णालयात या महिलेचा स्वॅब घेतला असता त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. असे असतानाच आज सकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला. दुसरीकडे या महिला रुग्णाची बीड जिल्हा आरोग्य विभागात नोंद नाही, पोर्टलवर नोंद नसल्याने हा मृत्यू अद्याप तरी जिल्ह्यात गणला गेला नसल्याचे सांगण्यात आले.मात्र लवकरच याची नोंद करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बीडमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा

बीड जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९० वर पोहोचली असून आतापर्यंत त्यांपैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल ६४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थिती २४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातोश्री बाहेरील ३ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांना शौर्य पुरस्काराने गौरविणार

News Desk

कोरोना उपचारासाठी रुग्णालयाच्या मनमानी बिलांना चाप लावण्यासाठी सरकारचा ‘हा’ निर्णय

News Desk