HW News Marathi
Covid-19

यवतमाळमध्ये चिंता वाढली ! जिल्हाधिकारी ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

यवतमाळ । राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता शासन आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहेत. विदर्भात विशेषतः कोरोनाचा संसर्ग वाढत असून अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता यवतमाळचे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह हे स्वतः रस्त्यावर उतरून सर्व गोष्टींची पाहणी करताना दिसले आहेत. नागरीक मास्क लावत आहेत का ? अन्य नियमांचे पालन करत आहेत का याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कोणकोणत्या उपाययोजना करत आहेत याविषयी देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यानी यावेळी मास्क न वापरणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यां नागरिकांवर पोलिसांच्या मदतीने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर देण्यात येणार असून, रुग्णवाहिका आणि कोविड सेंटर्स पुन्हा पूर्ववत करण्याच्या तयारीला देखील सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, रुग्ण वाढू नयेत म्हणून नागरिकांना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी केलेल्या चुका तुम्ही करु नका, जितेंद्र आव्हाड

News Desk

सिरमच्या नवीन कोव्होव्हॅक्स कोरोना लसीने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला टाकले मागे

News Desk

राज्यात नकोसा विक्रम ! आज 67 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद

News Desk