HW News Marathi
Covid-19

२०२१ मध्ये जानेवारी-फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता

मुंबई | २०२१ मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. “सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरुन भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे,” असं आरोग्य सेवा संचालनालयाने म्हटले आहे.

५ नोव्हेंबरला आरोग्य मंत्र्यांसह झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली होती. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसर राज्यभरातही खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं मत यावेळी मांडण्यात आलं. त्यानंतर आरोग्य सेवा संचलनालयाने जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला सूचना देऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे.

  • आरोग्य सेवा संचालनालयाच्या सूचना

    – कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी असली तर चाचण्या सक्षमपणे सुरु ठेवाव्यात

    – अधिक प्रमाणात फ्लू सदृश्य आजार असणारे रुग्ण आढळणाऱ्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, घरोघरी जाऊन नियमित सर्वेक्षण करावे

    – सुपर स्प्रेडर म्हणजेच ज्यांच्यामार्फत कोरोना त्वरित पसरु शकतो, अशा व्यक्तींचे सर्वेक्षण आणि चाचणी करावी. या व्यक्तींमध्ये किराणा दुकानदार, भाजीवाले, फेरीवाले, हॉटेल मालक, वेटर, वर्तमानपत्रे, दूध घरपोच करणारी मुलं, मोलकरणी, सिलेंडर पोहोचवणारे कर्मचारी, ट्रक रिक्षा चालक, मजूर, सुरक्षारक्षक

  • – प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण संख्येच्या प्रमाणानुसार कोरोना उपचाराची जबाबदारी संबंधित जिल्हा/शहारांमधील रुग्णालयांवर सोपवावी

    -गरजेनुसार तातडीच्या वेळी अधिकच्या खाटा उपलब्ध करण्याची योजना तयार असावी

    जिल्हा आणि महापालिका स्तरावरील टास्क फोर्सने स्थानिक परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घ्यावा

  • – रुग्ण संख्येनुसार 5 ते 7 सात रुग्णालयं कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवावीत
  • – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आणि प्रत्येक शहरी प्रभाग/तालुका विभागातील एक रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित ठेवावं.
  • – औषधे, साधनसामग्री आणि ऑक्सिजनचा पुरवठा हा बफर स्टॉक म्हणून उपलब्ध ठेवावा.
  • – रुग्णवाहिका सर्व आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या असाव्यात याची काळजी घ्यावी. याची माहती सर्वसामान्य जनतेला विविध माध्यमातून द्यावी
  • – 60 वर्षांवरील आणि अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अनलॉकनंतरही आपला जनसंपर्क मर्यादित ठेवावा. त्यांच्यासाठी कोमॉर्बिडिटी क्लिनिक सुरु करावे. तसंच त्यांची साप्ताहिक तपासणी करावी.
  • – कोविड नियंत्रणासाठी स्थानिक स्तरावर उपकेंद्र, वॉर्डनिहाय पथके कार्यरत असणे गरजेचे आहे. या पथकांनी होम क्वॉरन्टाईन असलेल्या रुग्णांची नियमित देखरेख करावी.
  • – यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी होणे गरजेचे आहे. फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांना श्वसनाचा त्रास आणखी वाढू शकतो.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट देणार। उद्धव ठाकरे

News Desk

“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

News Desk

केंद्र सरकारने दिलेल्या कार्यक्रमानुसार राज्य सरकारकडून लसीकरणाचं प्रशिक्षण पूर्ण- राजेश टोपे

News Desk