HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या चाचणी अहवालात पॉझिटिव्ह रिपोर्ट आले निगेटिव्ह…

मुंबई | कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, कोरोनाची चाचणी ज्या लॅबमध्ये केली जाते त्यांच्याकडून अहवाल येण्यास वेळ लागत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेले चाचणी अहवाल सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या लॅबमध्ये पुन्हा तपासले जात आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१ एप्रिल) प्रसारमाध्यमांना दिली. काही खाजगी लॅबमधून रुग्णांचे आलेले कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते, ते सरकारी लॅबमध्ये पुन्हा चेक केले असता, निगेटिव्ह आले आहेत. तर काही निगेटिव्ह आलेले अहवाल पुनर्तपासणीनंतर पॉझिटिव्ह आल्याचे उघड झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

खाजगी अहवाल देण्यासाठी सामान्यतः एक ते दोन दिवस लागतात. कदाचित खाजगी लॅबमध्ये किट्स उपलब्ध नसल्यामुळे तपासणीला विलंब होत आहे. कोरोनाच्या या नमुन्यांच्या तपासणीला अधिक कालावधी लागल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अचूक अहवाल देणाऱ्या खासगी लॅबमध्ये कोरोनासंदर्भात चाचणी करण्यास मनाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput :सीबीआय पथक मुंबईत दाखल, मुंबई पोलिसांसोबत होणार आज बैठक

News Desk

…तर अजित पवार म्हणाले, आणि रोहित पवारांनी देखील केंद्राकडून केली मदतीची अपेक्षा!

News Desk

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेतील एक बुध्दीमान व व्यासंगी व्यक्तीमत्व हरपले -शरद पवार

News Desk