HW News Marathi
Covid-19

आता ‘कोरोना’चा रिपोर्ट थेट रुग्णाला मिळणार नाही, मुंबई ‘मनपा’चा निर्णय

मुंबई | कोरोना चाचणीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून आता एक मोठा बदल करत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, “कोणत्याही रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट हा आता थेट त्या संबंधित टेस्टिंग लॅबकडून रुग्णाला देण्यात येणार नाही. तर संबंधित टेस्टिंग लॅबला तो रिपोर्ट प्रथम केवळ मुंबई महानगरपालिकेला द्यावा लागेल. त्यानंतर महानगरपालिका तो रिपोर्ट संबंधित रुग्णापर्यंत पोहोचवले.”

आता मुंबईतील कोणत्याही टेस्टिंग लॅबला कोरोना टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट हा थेट संबंधित रुग्णाला देता येणार नाही. तो रिपोर्ट आधी महानगरपालिकेला पाठवला जाईल आणि त्यानंतर रुग्णाला दिला जाईल, असे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. खरंतर, यापूर्वीपर्यंत कोरोना टेस्टचा रिपोर्ट हा महानगरपालिका आणि रुग्ण अशा दोघांनाही एकत्र पाठवला जात होता. मात्र, आता या नव्या परिपत्रकानुसार कोरोना टेस्टचा रिपोर्ट रुग्णांना उशिरा मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३३ लाखांच्या पुढे, जगात १ तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत

News Desk

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता ३१ डिसेंबर घरीच साजरा करा! – शंभूराज देसाई

Aprna

मोदी सरकारने साखर उद्योगाला चालना देशासाठी पवारांनी सुचवले ‘हे’ पर्याय

News Desk