HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर किती परिणाम होणार?

नवी दिल्ली। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासन प्रशासनासह आता आरोग्य यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. हे अस असताना म्युकरमायकोसिसचा धोका दुरीकडे वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे रुग्ण देखील काही भागामध्ये दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अनेक दावे देखील केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

“लहान मुलांमध्ये कोरोना आढळला, तरी ती बहुतेक वेळा असिम्पटोमॅटिक अर्थात लक्षणविरहीत असतात. आणि दुसरीकडे सुदृढ बालकांना रुग्णालयात दाखल न करताही अत्यंत सौम्य लक्षणांसह कोरोनावर मात केली आहे अस देखिल आढळून आलं आणि सहव्याधी असणाऱ्या किंवा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या मुलांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते”, असं आरोग्य मंत्रालयाकडून आता जारी करण्यात आलं आहे. याआधी केंद्रीय व्यवस्थेतील अनेक तज्ज्ञांनी यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेचा यासाठी दाखला देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पीआयबीच्या माध्यमातून सांगितलेल्या परिपत्रकामध्ये एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी ८ जून रोजी यासंदर्भात दिलेली माहीत नमूद नमूद करण्यात आली आहे तर दुसरीकडे “भारत किंवा जगभरातून असा कोणताही डाटा मिळालेला नाही ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की लहान मुलांवर करोनाच्या पुढच्या लाटांचा गंभीर परिणाम होईल. सुदृढ मुलं यावर सौम्य लक्षणांनीही मात करू शकतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत नाही”, असं गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

निती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “बहुतेक वेळा लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणं नसतात. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ कमी असते, काही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, पण त्यांचं प्रमाण खूप कमी असू शकेल”, असं डॉ. पॉल यांनी सांगितलं आहे. तर १ जून रोजीच पॉल यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडली होती. त्यासोबतच, “कोरोनाची लागण होण्याची शक्यता असणाऱ्या मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधांची उभारणी करण्यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत”, असं देखील पॉल यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी ऑनलाईन साधने वापरावीत | राज्यपाल

News Desk

११ लाख ९० हजार कामगारांची ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात पाठवणी

News Desk

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य दिनी ध्वजारोहण करून जयंत पाटील दिल्या शुभेच्छा

News Desk