मुंबई। कोविशिल्ड लस विकसित करणारी सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचे प्रमुख अदर पूनावाला यांनी आज लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोवोवॅक्स लस लहान मुलांकरता पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीपर्यंत येईल, अशी माहिती अदर पूनावालांनी दिली आहे. तसेच मोठ्यांसाठी ही लस यावर्षी ऑक्टोबरपर्यंत भारतात लाँच होणार आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांना अदर पूनावाला भेटले. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘पैशांची कोणतीही कमी नाही आहे. आम्हाला मिळत असलेल्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप आभारी आहोत.’
सरकार आमची मदत करत आहे
अदर पूनावाला यांनी मंत्री मंडावियांसोबत भेट झाल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळेस पूनावाला म्हणाले की, ‘सरकार आमची मदत करत आहे. कोणतेही आर्थिक संकट नाही आहे. आमची कोवोवॅक्स लस यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मोठ्यांसाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे. या लसीची किंमत लाँचिंग दरम्यान कळेल. तसेच लहान मुलांसाठी ही लस २०२२च्या पहिल्या तिमाहीत येईल.’
१७ देशांनी कोविशील्डला मान्यता दिली
अदर पूनावाला यांनी मांडविया यांच्यासोबतच्या बैठकीत कोविशील्डच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही लसीचे उत्पादन वाढवण्यावर चर्चा केली आहे. युरोपमधील १७ देशांनी कोविशील्डला मान्यता दिली आहे आणि अनेक मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत आहेत.’
Govt is supporting us. There is no financial crunch. We're very thankful to Modi Ji for their support. We’re hoping that Covovax will launch in India by October for adults. We’re always trying to increase the capacity of vaccines: SII CEO Adar Poonawalla (file pic) pic.twitter.com/ApjsaaN53u
— ANI (@ANI) August 6, 2021
कोवोवॅक्स लसीची चाचणी
माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट देशभरातील १० ठिकाणी ९२० मुलांवर कोवोवॅक्स लसीची चाचणी करणार आहे. यामध्ये २ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असेल, ज्यांना वेगवेगळ्या गटात विभागले जाईल. पहिला गट २ ते ११ वयोगटातील मुलांचा असेल तर दुसऱ्या गटात १२ ते १७ वयोगटातील मुलं असतील. प्रत्येक गटात ४६०-४६० मुलं असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.