HW News Marathi
Covid-19

केंद्राकडून मिळणाऱ्या लसीचा साठा शासकीय लसीकरण केंद्राला मिळणार, राज्य सरकारचा मोठा मिर्णय

मुंबई | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करतानाही अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे केंद्र सरकारकडून मिळणारा लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच वापरला जाणार असून या लसींचा साठा खासगी रुग्णालयांना करण्यात येणार नाही.

राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं ठाकरे सरकारनं आता खासगी रुग्णालयांना लसींचा साठा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून लसींचा साठा खरेदी करावा लागणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे. उद्यापासून (१ मे) या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांकडे असलेला कोरोना लसींचा अतिरिक्त साठादेखील राज्य सरकार परत घेण्याची शक्यता आहे.

१ मेपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. मात्र महाराष्ट्राह अनेक राज्यांकडे लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे १ मेपासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार नाही. राज्य सरकारकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा असावा यासाठी आता महत्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडून येणारा कोरोना लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालयं आणि लसीकरण केंद्रांमध्येच वापरण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

News Desk

विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार !

News Desk

‘फक्त भो भो करू नका ,आरोप सिद्ध करा !’ सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईन…महापौरांचा सौमय्यांवर पलटवार …

News Desk