HW News Marathi
देश / विदेश

#CoronaVirus | राज्याची चिंता वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा ४०० पार

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे, विशेषतः मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असून हे आपली चिंता आणखी वाढविणारे आहे. राज्यातील कोरोनाबाधितांना आकडा आता ४०० पार गेला आहे. आज (२ एप्रिल) सकाळी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३५ होता. आजच्या दिवसभरात आतापर्यंत हा आकडा थेट ८१ ने वाढला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४१६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाचा आकडा ३४१ झाला होता. तर एकट्या मुंबईतील आकड्यात ५७ ने वाढ होऊन सध्या मुंबईत एकूण १९८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तासागणिक वाढत जाणारा हा आकडा पाहता आता राज्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राज्यात आज नव्याने सापडलेले ८१ ‘कोरोना’बाधित 

मुंबई – ५७

पुणे – ६

पिंपरी-चिंचवड – ३

ठाणे – ५

अहमदनगर – ९

बुलडाणा – १

वसई – १

हिंगोली – १

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४१६

मुंबई – २३८

पुणे – ४४

पिंपरी चिंचवड – १५

सांगली – २५

नागपूर – १६

नवी मुंबई – १३

कल्याण – १०

ठाणे – ८

वसई विरार – ६

पनवेल – २

उल्हासनगर – १

अहमदनगर – १७

बुलडाणा – ५

यवतमाळ – ४

सातारा – २

कोल्हापूर – २

पालघर- १

गोंदिया – १

औरंगाबाद – १

सिंधुदुर्ग – १

रत्नागिरी – १

नाशिक – १

जळगाव- १

हिंगोली – १

इतर राज्य (गुजरात) – १

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसची स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर, सोनिया गांधींसह ३० जणांचा समावेश!

News Desk

पाकिस्तानचे कर्ज फेडण्यासाठी इम्रान खान यांनी केला म्हशींचा लिलाव

swarit

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थेट ‘एलोन मस्क’ ला महाराष्ट्रात येण्याचे जाहीर आमंत्रण

Aprna