HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus | आता शहरांतील झोपडपट्टी परिसरांतही ‘कोरोना’चा शिरकाव

मुंबई | देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा हा आता आपल्यासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या म्हणजेच लोकल ट्रान्समिशन स्टेजमध्ये आहे. आपल्याला याच स्टेजवर हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा आहे. म्हणूनच, केंद्र आणि सर्व राज्य सरकारे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, आता एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. कारण, आता मुंबईतील झोपडपट्टी परिसरांत कोरोनाचे नवे केंद्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. झोपडपट्टी परिसरांत दाटीवाटीने असलेल्या वस्तीमुळे इथे कोरोनाच्या संसर्गाची भीती अधिक आहे. त्यातच मुंबईतील झोपडपट्टी भागांत काही रुग्ण आढळल्याने आता ही शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईतील दहिसर भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. दरम्यान, दहिसरमधील ज्या भागांत हे रुग्ण आढळले तो पूर्ण परिसर सध्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दहिसरमधील आंबावडी झोपडपट्टी परिसरातही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबईतील झोपडपट्टीतील कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, दाटीवाटीची वस्ती असलेल्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला तर तो रोखणे मोठे कठीण होऊ शकते. त्यामुळे, खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सीएम वगैरे गेले उडत’, नारायण राणेंचा संताप

News Desk

परमबीर सिंग यांनी 3.5 कोटींची खंडणी वसुली केली, बुकीनेही टाकला लेटर बॉम्ब

News Desk

सचिन वाझेंचा NIA कोर्टात जामिनासाठी अर्ज

News Desk