HW News Marathi
महाराष्ट्र

वेतन कपातीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, रोहित पवारांचे आवाहन

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली. दरम्यान, कोरोनाच्या या काळात अनेक अफवा पसरत आहेत. अशीच एक अफवा पसरत असल्याने रोहित पवार यांनी लोकांना आवाहन केले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन कर्जय-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे केले आहे. कोरोनामूळे राज्याचा तिजोरीवर परिणाम होत आहे आणि त्यामूळेच काही निर्णय सरकार घेत आहेत. मात्र, राज्यसरकारच्या काही निर्णयावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याचेच उत्तर रोहित पवार यांनी दिले आहे.

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वेतन कपातीमध्ये आरोग्य, पोलीस आणि कोरोनाशी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांनी काहीही काळजी करु नये. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टीकरण देणार आहेत. तसेच कुणीही उगाच अफवा पसरु नये, अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”, मनसेचा इशारा  

News Desk

#CoronaVirus : आजपासून पुण्यात तीन दिवस बाजारपेठा बंद, तर घरोघरी जाऊन करणार सर्वेक्षण

swarit

“इंटर्व्हलनंतरची स्टोरी मी सांगतो”, NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा

News Desk