HW News Marathi
देश / विदेश

#CoronaOutbreak | आता घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य

मुंबई | राज्यामध्ये आता घराबाहेर पडताना लोकांनी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील सर्वांनी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता गुरहमंत्र्यांनी देखील याबाबतची माहिती दिली आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. तासागणिक वाढणारा हा आकडा सध्या राज्यासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. ‘कोरोना’संदर्भात राज्य सरकारकडून यापूर्वी वारंवार अनेक सूचना आणि आवाहने केली जाऊनही काही लोकांकडून मात्र त्याचे पालन होत नव्हते. त्यामुळे आता राज्य सरकारने हा कडक नियम करण्याचा निर्णय घेतला आहे.

“राज्यातील ‘कोरोना’ची हॉटस्पॉट असलेली जी जी शहरे आहेत त्या सर्व शहरांमधील नागरिकांना आता घराबाहेर पडताना मास्क घालणे अनिवार्य आहे. राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर तसेच अन्य काही शहरांचा समावेश होतो. या सर्व शहरांतील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालावे”, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आपण राज्य सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देखील राज्य सरकारने दिला आहे.

मास्क घातले नाही तर मुंबईकरांना होणार अटक !

राज्य सरकारसोबतच मुंबई महानगरपालिकेकडूनही आता मुंबईकरांना देखील सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी ८ एप्रिल रोजी एक परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे, जे महानगरपालिकेच्या या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत कारवाई होणार आहे. याअंतर्गत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला अटकही होऊ शकते. असेही महानगपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बाधित हे सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी ही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

“रस्ते, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, बाजारपेठा अशा सार्वजनिक ठिकाणी 3 प्लाय किंवा घरगुती स्वच्छ मास्क वापरणे बंधनकारक आहे. तर गाडी चालवताना ड्राइव्हर तसेच गाडीमध्ये बसलेल्या सर्वांनी मास्क घालणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे मास्क घातल्याशिवाय कोणत्याही बैठकांना किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही”, असे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीकरिता आता सर्व महापालिका सहाय्यक आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांतर्गत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिस किंवा सहाय्यक आयुक्तांच्या नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून कारवाई देखील होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हरियाणाच्या सुषमा स्वराज यांची रंजक प्रेम कहाणी

News Desk

राम विलास पासवान यांचे निधन म्हणजे माझे वैयक्तिक नुकसान – पंतप्रधान

News Desk

स्वयंघोषित अध्यात्मिक संत रामपाल दोन्ही हत्याप्रकरणी दोषी

News Desk