HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : मुंबईनंतर आता पुण्यात रॅपिड टेस्ट किट्सचा वापर

पुणे | कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी पुण्यात कडक बंदी करण्यात आली आहे. राज्यात मुंबईनंतर सगळ्यात जास्त कोरोनाबाधित हे पुण्यात असल्याकारणाने शक्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच, संशयित रुग्णांची रॅपिड टेस्ट किट्सद्वारे तपासणी केली जाणार असून, रेड झोनमध्ये याचा वापर केला जाणार आहे. येत्या दोन दिवसांत या किट्स मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामूळे, संशयित रुग्ण ओळखण्यासाठी रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्याकडे ७५ हजार रॅपिड टेस्ट किट्स आल्या असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केले आहे. मुंबईनंतर आता पुण्यात याचा वापर केला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

News Desk

भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या – आठवले

swarit

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे! – आदित्य ठाकरे

Aprna