HW News Marathi
महाराष्ट्र

नगरसेवक दीपक मानकर आज सकाळी पोलिसांना शरण 

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर माजी उपमहापौर तथा नगरसेवक दीपक मानकर बुधवारी सकाळी पोलिसांना शरण गेले. न्यायालयाने जामीन फेटाळताना १० दिवसांच्या आत पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी दीपक मानकर हे लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले. समर्थ पोलीस ठाण्याजवळील एका जागेवरुन वादातून ही घटना घडली होती.

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर आत्महत्येला जबाबदार असल्याचे लिहिले होते. यावरुन मानकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दीपक मानकर यांनी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला़ त्यानंतर मानकर मुंबई उच्च न्यायालयात देखील दाद मागितली होती. तेथेही जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने १० दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे मानकर बुधवारी सकाळी पोलिसांना शरण गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्ह्यात ६९.६१ टक्के मतदान

News Desk

किरीट सोमय्या सोमवारी बॉम्ब टाकणार; ते दोन नेते कोण? तर्कवितर्कांना उधाण!

News Desk

राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा, तर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे !

News Desk