HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर पालिकेतील १९ नगरसेवकांचे पदे रद्द

कोल्हापूर | महानगर पालिकेतील १९ नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहेत. या नगरसेवकांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्यामुळे या नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ताराराणी आघाडी आणि शिवसेना या पक्षातील नगरसेवकांची पदे रद्द करण्यात आली आहेत. कोल्हापूर महापालिकेने १९ नगरसेवकांची पदे रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतर सहा महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. या नगरसेवकांची पदे रद्द केल्यानंतर या प्रभागात फेरनिवडणूक होणार आहे. ज्या नगरसेवकांची पदे रद्द झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची १२ आणि काँग्रेसची ८ या दोन पक्षातील जास्त नगरसेवकांचा समावेश आहे. यात अश्विनी रामाणे, स्वाती येवलुजे आणि हसीना फरास या तीन माजी महापौरांचा समावेश आहे.

पद रद्द झालेली नगरसेवकांची नावे

१. संदिप नेजदार

२. दीपा मगदूम

३. स्वाती येवलूजे

४. हसीना फरास

५. अश्विनी रामाणे

६. किरण शिराळे

७. सचिन पाटील

८. विजय खाडे पाटील

९. नियाझ खान

१०. मनीषा कुंभार

११. अश्विनी बारामते

१२. संतोष गायकवाड

१३. शमा मुल्ला

१४. सविता घोरपडे

१५. वृषाली कदम

१६. रीना कांबळे

१७. गीता गुरव

१८. कमलाकर भोपळे

१९. अफझल पिरजादे

कोल्हापूर महापालिकेतील संख्याबळ

  • भाजप – १३
  • ताराराणी – १९
  • काँग्रेस – २७
  • राष्ट्रवादी काँग्रेस -१५
  • शिवसेना -०४
  • अन्य – ०२
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा मोर्चाचे दुसरे पर्व

News Desk

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Aprna