HW News Marathi
महाराष्ट्र

कळसकरचा ताबा मिळविण्यासाठी सीबीआयने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

मुंबई | सीबीआयने नालासोपारा स्फोटके प्रकरण आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याचा ताबा मागणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाकडे केला होता. मुंबई सत्र न्यायालयाकडून मात्र सीबीआयचा हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. एखादी व्यक्ती एका तपासयंत्रणेच्या पोलीस कोठडीत असताना त्या व्यक्तीला दुसऱ्या तपासयंत्रणेच्या पोलीस कोठडीत देण्याचा युक्तिवाद मुळातच कायदेशीर नाही,असे सांगत मुंबई सत्र न्यायाल्याने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

शरद कळसकरला नालासोपारा स्फोटके प्रकरणात तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. सीबीआयला एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकर आणि सीबीआयच्या ताब्यात असलेल्या सचिन अंदुरे यांना एकत्र बसवून चौकशी करायची होती. परंतु पुणे कोर्टाने २३ ऑगस्टला कळसकर विरोधात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले त्याचवेळी सीबीआयने कळसकरचा ताबा घेण्यासाठी कोर्टाकडे अर्ज का केला नाही, पाच दिवस वाया का घालवले, असा प्रश्नही मुंबई सत्र न्यायालायने केला.

Related posts

नाशिक महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्तांचा बदलीसाठी विनंती अर्ज

News Desk

हो, मी भक्त आणि त्याचा मला अभिमान!

News Desk

दिशाहीन काँग्रेससोबत न जाता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार !

News Desk