HW News Marathi
Covid-19

कोव्हॅक्सिनची किंमत कोव्हिशिल्डच्या तुलनेत राज्यांसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी दुप्पट

नवी दिल्ली | भारत बायोटेकने स्वदेशी लस असलेल्या COVAXIN लसीच्या प्रति डोसच्या किंमत घोषित केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, राज्य सरकारसाठी प्रति डोस ६०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांसाठी १२०० रुपये प्रति डोस दराने देण्यात येणार आहे. भारत बायोटेकने सांगितलं की, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, आम्ही कोवॅक्सिन लसीच्या डोसच्या किमतींची घोषणा केली आहे.

कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “१५० रुपये प्रति डोसचा सध्याचा करार संपल्यानंतर केंद्र सरकारसाठीही लसीच्या प्रति डोसची किंमत ४०० रुपये प्रति लीटर असणार आहे. सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात सांगितलं की, “भारत सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी ५० टक्के आणि उरलेला ५० टक्के साठी राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे.”

 

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, सरकारच्या निर्देशांनुसार ‘कोविशील्ड’ची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रति डोस आणि खाजगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रति डोस असणार आहे. दरम्यान, या किमतीवरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यांचं म्हणणं होतं की, जर केंद्र सरकारला लसीचे डोस १५० रुपयांना उपलब्ध करुन दिले जात आहेत, तर राज्य सरकारला का अधिक किंमतीत का देण्यात येणार?”

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविड १९ प्रतिबंधक लस कोविशिल्डच्या किंमतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आगाऊ निधी मिळाल्यामुळे सुरुवातीला या लसीची किंमत जागतिक पातळीवर कमी होती, परंतु आता लस उत्पादन वाढवण्यात गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असं स्पष्टीकरण सीरमने दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासगी रुग्णालयातील सिटी स्कॅनचे दर निश्चित – राजेश टोपे

News Desk

पुण्याहून १ किलो चांदीची वीट जाणार अयोध्येला !

News Desk

पुण्यातून बाहेर पडायचे आहे ? वाचा ही प्रेस नोट

News Desk