HW News Marathi
Covid-19

रत्नागिरीत कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी उभारली प्रयोगशाळा, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

रत्नागिरी | रत्नागिरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १ कोटी ७ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विषाणू प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (९जून) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळीआरोग्यमंत्री राजेश टोपे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि अनेक मंडळी उपस्थित होते.

प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्यविषयक मूलभूत सुविधेत वाढ. यापुढे COVID_19 विषयक चाचण्यांची गती वाढेल. आणि या प्रयोगशाळेचा जिल्ह्यातील सर्वांना फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, जिल्ह्यातून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी, आणि त्याचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

लॉकडाऊनचा उपयोग आरोग्य सुविधांच्या वाढीसाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु करण्यात आले आहे. COVID_19 चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ २ प्रयोगशाळा होत्या, आता ही संख्या ८५ झाली.. आहे. संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

News Desk

कोरोनाचे IPLवर सावट, BCCI ची आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याची घोषणा

News Desk

धक्कादायक! नवी नवरीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह, तर वऱ्हाडी झाले क्वारंटाईन

News Desk