HW News Marathi
Covid-19

सातारा जिल्हा रूग्णालयात कोविड चाचणी सेंटर सुरू होणार,अजित पवारांची घोषणा

सातारा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२६ जून) ला सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला . यावेळेस त्यांनी पत्रकारपरिषदेत सातारा जिल्ह्यासाठी मोठी घोषणा केली आहे. सातारा जिल्हा रूग्णालयात कोविड चाचणी सेंटर सुरू होणार असल्याचीमाहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.अजित पवार म्हणाले की, कोरोना स्थितीचा मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेत आहोत. कुणीही अन्नपाण्याविना राहणार नाही, याची राज्याकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दुकाने, उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवरउपासमारीची वेळ आली आहे. काहीही करून महाराष्ट्र राज्याला आपल्याला कोरोना संकटातून बाहेर काढायचे आहे.

याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे पवार म्हणाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाची ६९ एकरजागा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर, नव्या शासकीय विश्रामगृहातील आराखडा तयार करण्यात आला आहे, असेअजित पवार म्हणाले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नाहीत, त्या कंपन्यांवर कारवाई करण्याचा राज्य सरकारने निर्णयघेतला आहे. कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असेही अजित पवार म्हणाले. साताऱ्यात कायमस्वरूपी हेलिपॅड बांधण्याचानिर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यात लॅाकडाऊन! अधिवेशनानंतर मुंबई,पुण्यात लॅाकडाऊन होणार?

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल ६९ हजार गुन्ह्यांची नोंद

News Desk

स्थलांतरित मजुरांच्या सद्यस्थितीची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

News Desk