HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण!

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. संख्या जरी कमी होत असली तरी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. ल्या 24 तासांत देशात 41 हजार 383 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 38 हजार 652 रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात बुधवारी 507 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून देशात रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे.

राज्यातील रुग्णसंख्या

दिवसभरात राज्यात ८ हजार १५९ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७ हजार ८३९ रुग्ण बरे झाले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १६५ रुग्णांचा मृत्यू झालाय. एकूण मृत्यूंची संख्या १ लाख ३० हजार ९१८ झाली आहे. आतापर्यंत ६० लाख ०८ हजार ७५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात सध्या ९४,७४५ सक्रिय रुग्ण आहेत.

 

राज्यात गेल्या २४ तासांत ८,१५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली

गेल्या २४ तासांत नवीन ७,८३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत

एकूण ६०,०८,७५० रुग्ण घरी बरे होऊन गेले आहेत

राज्यात एकूण ९४,७४५ सक्रिय रुग्ण आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! राज्यात आज १०,५७६ रुग्ण आढळले, तर ५५५२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

News Desk

…म्हणून देशातला लॉकडाऊन अयशस्वी, राहुल गांधींचा दावा 

News Desk

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये लॉकडाऊन लागू शकतो !, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

News Desk