HW News Marathi
Covid-19

नागरिकांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी योजना’ तयार करा !

मुंबई | राज्यात कोरोनाचा आकडा तासागणिक वाढत आहे. येत्या काळातही कोरोनाबाधितांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. म्हणून, योग्य समन्वय आणि नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करण्याच्या सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. एक खिडकी योजना म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलबध करून देणे. पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा व सोलापूर जिल्हयात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या उपाययोजनाबाबत आज (४ मे) आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत राजेश टोपे बोलत होते.

येत्या काळात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने पुरेशा बेड्सची व्यवस्था करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार करून मृत्यूदर कमी करण्यासह कोरोनाबाधितांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, याबाबत देखील या बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, कोरोनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही रुग्णाकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होता कामा नये, असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सा.आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके या आढावीत बैठकीत उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन ! | नाना पटोले

News Desk

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या ३० हजार जागा भरणार

News Desk

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्याची प्रणाली विकसित करणार !

News Desk