HW News Marathi
Covid-19

राज्यातील ३५ हजार कैद्यांपैकी, १७ हजार कैद्यांची तात्पुरती कारागृहातुन सूटका

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात कारागृहातील कैद्यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामूळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने या कैद्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात १८५ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामूळे राज्यातील इतर कारागृहात ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात जवळपास ३५ हजार कैदी कारागृहात आहेत. त्यापैकी १७ हजार कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

दरम्यान, अंडर ट्रायल असलेल्या ५ हजार कैद्यांना मधल्या काळात सोडण्यात आले होते. तसेच, ज्या कैद्यांना ७ वर्षाटी शिक्षा झाली आहे अशा ३ हजार कैद्यांना आणि ७ वर्षाच्या पुढे ज्यांना शिक्षा मिळाली आहे अशा ९ हजार कैद्यांना असे एकूण ३५ हजारांपैकी १७ हजार कैद्यांना तात्पुरते सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मात्र बलात्कार, मोठे आर्थिक घोटाळे केलेले गुन्हेगार, मोक्का, टाडा यासारखे गंभीर गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सोडलं जाणार नाही, अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली. तसेच राज्यातील 8 कारागृहांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहेत. म्हणजे या कारागृहांमध्ये नवीन कैदी किंवा पोलीस येणार नाही आणि आत असलेले कैदी किंवा पोलीस बाहेरही जाणार नाहीत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करा – अजित पवार

News Desk

मुंबई लोकल ऑगस्टपासून सुरू करण्याचा सरकारचा विचार

News Desk

आमदारांचा निधी २ कोटीने कमी करा आणि तो कामगारांना द्या,चंद्रकात पाटलांची सरकारकडे मागणी!

News Desk