HW News Marathi
महाराष्ट्र

नगरच्या एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय!; विखे पाटलांचा इशारा

मुंबई। राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते. आणि काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि ज्यावेळी विखे पाटील हे काँगेसमध्ये होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी राज्याचं विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलं. पण 2019 च्या निवडणुकांत काही राजकीय अंदाज विस्कळीत झाले आणि त्यांनी काँग्रेसलालाच रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशापासून विखे पाटील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर वारंवार टीका करत असतात. मात्र अस जरी असले तरी थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. आता बाळासाहेब थोरातांचं नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय, अशी विखारी टीका विखे पाटील यांनी केली.

जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल

नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल,’ असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. विखे पाटील यांनी कोणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र, त्यांची तोफ ही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याचं दिसून येत.माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सनसनाटी आरोप केला. हा मंत्री कोण, असं काही माध्यमांनी विचारलं तर राधाकृष्ण विखे पाटलांकडून उत्तर मिळालं ‘जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल,’ त्यांनी थोरातांचं नाव घेणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांचा निशाणा मात्र काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांकडेच होता, हे स्पष्टपणे दिसतं.

नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला

थोरात यांच्याकडे महा विकास आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्रीपदाची जबाबदारी आहे. थोरातांच्या खात्यावर बोट ठेवत अप्रत्यक्षरित्या या खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं विखे पाटील म्हणाले. त्याबरोबरच नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला. हे आपोआप समोर येईल, अशी पत्रिका पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर मध्ये केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळ्याहून निघालेली पपईची गाडी उलटली, अपघातात १५ मजुरांचा झाला मृत्यु

News Desk

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

News Desk

“भाजप जनतेला धोका देत आहे” ​नवाब मलिक यांचा आरोप

News Desk