HW News Marathi
महाराष्ट्र

“केम छो वरली”, शिवसेनेचे परप्रांतीय मतांसाठी राजकारण

मुंबई | युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर शिवसैनिक आदित्य ठाकरेच्या प्रचारला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या वतीने वरळी मतदारसंघातील ठिक ठिकाणी नागरिकांना बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेचे बॅनर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. त्यामागचे कारण म्हणजे शिवसेनेच्या बॅनरमध्ये आदित्य ठाकरेंचा फोटो असलेल्या आणि “केम छो वरली” अशी विचारणा करणारे बॅनरचे फोटो व्हायरल होत आहे.

शिवसेनेने वरळी मतदारसंघातील नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेतून कसे आहात वरळी असा मसेज असलेले बॅनर लावले आहे. या परप्रांतीय भाषेतील नागरिकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी सेनेची ही नवी खेळी असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगूल लगल्या आहेत. शिवसेनेच्या मराठी बॅनरपेक्षा इतर भाषेतील बॅनरमुळे चर्चा झाली आहे. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख सांगितली जाते.

वरळीतील गुजराती व्यापाऱ्यांची मते मिळविण्यासाठी ही बॅनर लावण्यात आली असून गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत, अशी टीका शिवसेनेने अनेकदा केली आहे. शिवसेना ही त्यांच्या सोयीस्कर भूमिका घेत अल्याच्या टीका सोशल मीडियावर केल्या जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वारातीम विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. रमजान मुलानी

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, कॉंग्रेसचा उपरोधिक टोला   

News Desk

श्रीपाद छिंदम नगर जिल्ह्यातून तडीपार

News Desk