HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

बीड। भाजपच्या राष्ट्रीय महासचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. मागील वर्षी दसरा मेळाव्यात आम्ही भगवान गडावर गेल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी कांग्रेसच्या बड्या नेत्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे झाले. आजही मेळावे घेतले जात आहेत, याबाबत आपण पोलीस अधीक्षकांशी बोलणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

इतकच नाही तर मी आता पोलीस अधीक्षकांना भेटणार

परळीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आलीय. त्याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मोठा अहंकार असल्याचं पंकजा म्हणाल्या. इतकच नाही तर मी आता पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्या कार्यालयावरही गुन्हे दाखल झाले. त्याच दरम्यान जिल्ह्यात वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम, दिवाळी फराळाचे कार्यक्रम झाले. आता मेळावे घेतले जात आहेत, त्याबाबत तुम्ही काय करणार? असा सवाल आपण एसपींना विचारणार असल्याचं पंकजा म्हणाल्या.

लोक आर्थिक अडचणीत आणि यांचं काय सुरु?

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. मोठाले केक कापले गेले. कोरोना अद्यापही गेलेला नाही. लोक आर्थिक अडचणीत आहेत आणि यांचं काय सुरु आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी नाव न घेता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय. सत्ता असो की नसो दुरुपयोग करणं हेच त्यांना कळतं, असा टोलाही पंकजा यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांनी केले ट्विट

swarit

बीडमधील पाटोदा तालुक्यात मुलींचा जन्मदर घसरला, पंकजा मुंडे संतापल्या

Aprna

कोरोनावर लस शोधून शास्त्रज्ञांनी देशवासियांना जीवनदान दिले, केंद्रीय अर्थसंकल्पाने जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले – अजित पवार

News Desk