HW News Marathi
महाराष्ट्र

रडणाऱ्यांना आणि पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही; संजय राऊत भडकले

मुंबई। नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साबणे यांच्या पक्षांतरामुळं शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज या संतापाला वाट मोकळी करून दिली. साबणे यांच्याबरोबरच राऊत यांनी भाजपवरही टीकेची तोफ डागली.

‘गेली अनेक वर्षे भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं आपल्या पक्षात घेत नाही. भाजपकडं स्वत:चं असं काही नाही. आता एक निवडणूक लढण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा एक माणूस घेतलाय. तोही रडका. शिवसैनिक हा रडत नाही. परिस्थितीविरुद्ध लढतो. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही,’ असं राऊत म्हणाले. ‘दुसऱ्या पक्षातील लोक घेऊन सूज दाखवायचं जे धोरण भाजपनं सुरू केलंय, ते फार काळ चालणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.

अंतापूरकर यांच्या निधनानंतर साबणे यांनी या जागेवर दावा केला होता

रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. ही जागा राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, तर मंगळवेढ्यानंतर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडं आहे. महाविकास आघाडी नसताना युतीचे उमेदवार म्हणून साबणे यांनी शिवसेनेकडून इथं निवडणूक लढवली होती. मात्र, अंतापूरकर यांच्या निधनानंतर साबणे यांनी या जागेवर दावा केला होता. मात्र, शिवसेनेनं या जागेसाठी आग्रह धरला नाही. आपल्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं दिसताच साबणे हे भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. भाजपनं त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मन बात’ नको ‘काम की बात’ करा, जळगाव दौऱ्यात शिवसेनेनं फडणवीसांची गाडी अडवत केली टोलेबाजी

News Desk

‘देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारविरोधात आक्रमक’,म्हणाले…

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, चौकशीला गैरहजेरी

News Desk