मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच होती हे एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातनंतर स्पष्ट झाले आहे. या अहवालावर भूमिका मांडताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असे काल (५ ऑक्टोबर) म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडीयाच्या माध्यमातून सिंग यांची बदनामी केली जात असल्याचे प्रकरणी समोर आले. दरम्यान, याप्रकरणी मुंबई सायबर सेलने २ गुन्हे दाखल केले आहेत.
सायबर सेलच्या पोलीस उपआयुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली आहे. “ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील अनेक अकाऊंटधारक मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करत आहेत. त्यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या अकाऊंटधारकांवर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खाती बनावट आहेत आणि पोलिसांकडून त्या सर्व बनावट खातेदारांवर कारवाई केली जाईल. दुसरा गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचा फोटो वापरणाऱ्यांवरही दाखल करण्यात आला आहे. आम्ही या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे,”असे करंदीकर यांनी सांगितले आहे.
2 FIRs registered under IT Act against many social media account holders & fake accounts for defaming Mumbai Police Commissioner on different platforms like Twitter, Instagram & FB & using abusive language against him & the force: Rashmi Karandikar, DCP-Cyber Cell, Mumbai Police pic.twitter.com/78Gc6aPyn7
— ANI (@ANI) October 6, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.