HW News Marathi
महाराष्ट्र

Cyclone Tauktae : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ राज्यांतही चक्रीवादळामुळं सतर्कतेचा इशारा

मुंबई | अरबी समुद्रात ‘ताऊते’ चक्रीवादळ घोंघावत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सोसाट्याचा वारा सुटणार असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबईत काल रात्रीपासून प्रचंड गार वारा सुटला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. सद्यस्थितीत मुंबईत काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सूर्यदेवाचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘ताऊते’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या १२ तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात ऑरेंज झोनही जारी करण्यात आला आहे.

या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे राज्यव्यापी ‘जीवनदान महाअभियान’ रक्तदान शिबिर ! | बाळासाहेब थोरात

News Desk

परमबीर सिंग यांनी 3.5 कोटींची खंडणी वसुली केली, बुकीनेही टाकला लेटर बॉम्ब

News Desk

“तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत”, मुख्यमंत्र्यांचा कंगनाला टोला

News Desk