HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात शिवसेना महिला कार्यकर्त्यांची दादागिरी आली समोर!

जळगाव। जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक भयानक प्रकार समोर आलाय. जळगाव शहरातील गोलाणी मार्केटजवळ हा संतापजनक प्रकार घडला. शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने किर्तीकुमार चोरडिया नामक व्यक्तीच्या आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ घेतले. पण पैसे न देताच तेथून काढता पाय घेतला. यावेळी दुकानदाराने पैशांची मागणी केली असता त्याला फरफटत नेण्यात आलं. या प्रकरणाचे व्हिडीओ समोर आले शीतपेय व खाद्यपदार्थ घेतलेली महिला कारमधून निघून जात असल्याचे पाहून चोरडिया यांनी पैसे मागण्यासाठी त्यांच्या मागे धाव घेतली. आपण पैसे देणार नाही, असे उत्तर महिलेकडून चोरडिया यांना मिळाले. त्यामुळे ते संतप्त झाले. मात्र यावेळी कारचालकाने कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरडिया कारसोबत फरपटत गेले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ते कारच्या चाकाखाली येण्यापासून वाचले.

आपण दुकान सुरू ठेवल्याने आपल्यासोबत हा प्रकार

हा प्रकार अंगाशी येत असल्याचे पाहून शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्तेउ त्याठिकाणी जमले. त्यांनी चोरडिया यांची समजूत घालून वादावर पडदा टाकला. नंतर चोरडिया यांना बिलाचे पैसेही मिळाले. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने कारचालकाने कार थांबवली. त्याठिकाणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप चोरडिया यांनी केला. त्या संबंधित महिलेने आपण पैसे दिल्याचा दावा केला. मात्र, चोरडिया यांनी आपल्याला पैसे दिले नसल्याचे सांगितले. आपण दुकान सुरू ठेवल्याने आपल्यासोबत हा प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

भाजपचे माजी नगराध्यक्ष जखमी

संबंधित घटना ही वरणगाव बस स्टँड चौकात घडली. यावेळी दुकाने उघडण्यासाठी भाजपचा गट आला असता मोठा गदारोळ झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. बराच वेळ परिसरात दहशतीचं वातावरण होतं. पण पोलिसांनी मध्यस्ती केल्याने मोठा गदारोळ टाळता आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दावोसमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी ८८ हजार ४२० कोटींचे करार

Aprna

नाटक सुरु करण्यासाठी अडचण, कलाकार-दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला

News Desk

आता बघू, बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी! राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk