HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

पालघर सामूहिक हत्याकांडानंतर दत्तात्रय शिंदे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक

मुंबई | राज्य सरकारकडून पालघर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाकडून आज (२३ मे) दत्तात्रय शिंदेंच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. पालघरमध्ये सामूहिक हत्याकांडानंतर तत्कालीन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर, आता राज्य सरकारने गौरव सिंह यांच्या जागी दत्तात्रय शिंदे यांची पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक केली आहे. पालघरमध्ये १६ एप्रिल रोजी मोठ्या जमावाने ३ जणांची हत्या केली होती. ज्यांमध्ये २ साधूंचा समावेश होता. निव्वळ संशय आणि गैरसमजातून झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरला होता. त्याचप्रमाणे, पोलीस प्रशासनावरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्स्थत झाले होते.

संबंधित बातम्या

पालघर घटनेचे राजकारण करू नका, आता कोरोनाच्या संकटाविरोधात एकजुटीने लढू या !

पालघर प्रकरण : लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल!

Related posts

राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार !

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला !

News Desk

आषाढी वारी कशी असावी यासाठी चोपदारांनी सुचवले पर्याय

News Desk