मुंबई | पालघर मॉब लिंचिंग प्रकरणावरुन सर्व स्तरातून राज्य सरकारव टीका होता आहे. पालघरमध्ये झालेले घटना ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह असून अशा घटना घडायला नको होती. पालघरच्या घटनेचे राजकारण करू नका, आता कोरोनाच्या संकटाविरोधात एकजुटीने लढू या,असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना दिला आह. शरद पवार यांनी आज (२१ एप्रिल) फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना पालघर ते म्हणाले.
CM Uddhav Thackeray has spoken about the incident and doing whatever he can. But some people are raising question on law and order of the state even when the incident happened due to some rumours. This is not good: Sharad Pawar, NCP https://t.co/8KAMLeqqnA
— ANI (@ANI) April 21, 2020
पवार म्हणाले, राज्यात लातूर भूकंप, बॉम्ब स्फोट आणि दंगलीसारख्या परिस्थिती देखील कायदा सुव्यवस्था योग्य पद्धतीने काम केली होती. त्यामुळे देशभरात महाराष्ट्राचे नावलौकीक झाल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगतिले. मात्र, पालघर प्रकरणावरून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती भासवण्याचा विरोधकांचा प्रयत्न केला जात आहे. पालघरला जे झाले त्याचा कोरोनाशी काहीही संबंध नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे, हे देखील त्यांनी टीकाकारांच्या निदर्शनासा आणून दिली.
याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलली असून १०० लोकांना दुसऱ्याच दिवशी अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूकही केली आहे. सध्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत पोलीस दलातील लोक, वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे, राज्य शासनाचे कर्मचारी हळूहळू उपस्थित होऊ लागले आहेत. या लोकांप्रती आत्मीयता दाखवली आहे. आपण सगळे एकत्र आहोत ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे, असेही शरद पवारांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.