मुंबई | ईडीच्या कारवाईविरोधात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने मलिकांची ही याचिका फेटाळली. ई़़डीने मला केलेली अटक ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा चुकीचा असल्याचे न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले. तपास यंत्रणांची कारवाई ही नियमानुसार असल्याचे न्यायालयाने मलिकांच्या याचिकेवर आज (१५ मार्च) सुनावणीदरम्यान म्हटले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांची मालमत्ता खरेदी केल्या प्रकरणी ईडीने मलिकांना अटक केली असून मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मलिकांच्या प्रकरणावर विशेष न्यायालयात ७ मार्चला झालेल्या सुनावणीत त्यांची न्यायालयीन कोठडी २१ मार्चपर्यंत वाढवली. मलिकांची प्रकृती अस्वस्थ्यामुळे मलिकांची चौकशी पूर्णपणे करता आली नाही, असे ईडीने न्यायालयात सांगितले. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान मलिकांची तब्यात ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे गेल्या दिवसांपासून चौकशी करणे शक्य झाले नाही. यामुळे मलिकांच्या ईडीच्या चौकशीत वाढ करण्याची मागणी ईडीच्या वकिलानी न्यायालयात सांगितले. होते.
मलिकांनी दाऊदची ३०० कोटींची मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी त्यांचा संबंध असल्याचे तपासात आढळून आले. या पार्श्वभूमीवर मलिकांवर ईडीने कारवाई करत २३ फेब्रुवारी सकाळी त्यांच्या घरातून त्यांना अटक केली. मलिकांनी पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेत मला केलेली अटक ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा, यात केला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांची ही याचिका आज फेटाळून लावली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.