HW News Marathi
महाराष्ट्र

‘स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही’, अजित पवार म्हणाले…

मुंबई | उपमुख्यमंती अजित पवार यांनी स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही यावर त्यांचं मत दिलं आहे. राज्यभरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

जिल्हापातळीवर परिस्थिती वेगळी असते

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी होणार की नाही असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “जिल्हापातळीवर परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्याला अधिकार द्यावा. एकट्याने लढवायची की आघाडी करुन लढायची हा निर्णय जिल्हा पातळीवर व्हावा, असं माझं मत आहे. जिल्ह्या पातळीवर निर्णय घेतला तर मतविभाजन टाळून जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला यश मिळेल. स्थानिक लोक तिथे राजकारण करतात त्यांनी निर्णय घ्यावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

आज राजकीय चर्चा नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज(९ सप्टेंबर) भेट झाली आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पवारसाहेब अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आज राजकीय चर्चा नाही. असती तर आम्हाला बोलवलं असतं”, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “राष्ट्रवादीच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी भूमिका मांडली. आम्हाला काम करताना विकासकामाला निधी मिळत नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनल्यामुळे वेगळे समीकरण झालं. स्थानिक पातळीवर तेवढा समनव्य अजून झाला नाही”

कोरोना नियम

काही भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आता गणपती उत्सव आहे. मार्केटमध्ये गर्दी आहे. यामुळे कोरोना रुग्ण वाढले तर, म्हणून टास्क फोर्स, केंद्राने सूचना दिली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता बघून नियम लावले. उद्या काही झालं तर दोष सरकारवर येईल, असं अजित पवारांनी नमूद केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरवर २ ठिकाणी अपघात

swarit

ओमिक्रोनबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती!

News Desk

‘देशात तुरुंगाचे खासगीकरण झालयं का? सेनेचा विरोधकांना सवाल’

News Desk