HW News Marathi
महाराष्ट्र

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

कोल्हापूर | राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ जून) कोल्हापूर दौरा करुन तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी कोरोना संदर्भातील नियमांचं कडक पद्धतीनं पालन होईल याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यासोबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाबाबतची महत्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली होती. तसेच काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचीही घोषणा पटोलेंनी केली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी विधान केलं. “नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आपला पक्ष वाढावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली असेल तर स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. उद्या तुम्हालाही रिपोर्टरपदावरुन चिफ एडिटर केलं तर आवडणार नाही का? प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. पण शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून जे व्यक्ती आहेत. ते निर्णय घेत असतात. आता कोणत्या पक्षाशी आघाडी करायची की स्वबळावर लढायचं हा अधिकारा काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांना आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे आम्ही यावर मत व्यक्त करणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते नाना पटोले?

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखविल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.पटोले म्हणाले, ‘आता मघाशी अमानकर साहेबांनी म्हटलं की नानाभाऊंना मुख्यमंत्री करायचं आहे. मग हे कसं घडणार याच्यानंतर. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जाताना तुमच्या कलेक्टरला सांगून गेलो. यांनी अपील केली, मग झालं ना. मग कसं वाजवायचं हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही पाहिलं मला विधानसभेत. म्हणून तुम्हाला सांगतो सगळेजण एकजुटीने रहा. मुरलीधर राऊत तुम्ही खूप समाजसेवा केली. आता तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा सरळ. नानाभाऊंना मुख्यमंत्री बनवायचं आहे महाराष्ट्राचं. आपला माणूस आहे. तिथं कोण उभं आहे हे माहीत नाही. पण त्याच्याजवळून करायचं आपल्याला हे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाही तर हे असंच फिरवत रहायचं. कारण त्याला कुणाला काही समजतच नाही ना. सगळ्यांचं दु:ख ज्याला समजेल तोच करेल की नाही. तुम्ही पाहिला ना माझा संयम.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NSEL 5600 कोटी शेअर्स घोटाळा झाल्याचा राऊतांचा गौप्यस्फोट, चौकशी करण्याची मागणी

Aprna

नानाच्या नाना तऱ्हा!! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!, भाजपचा टोला

News Desk

एसटी कर्मचा-यांना सहा हजारांपेक्षा जास्त वेतनवाढ मिळणार?

News Desk