HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांवर निवडणुक आयोगाने कारवाई करावी, माजी आमदाराची मागणी!

अहमदनगर | राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार आणि भादप नेते राम शिंदे यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रोहित पवार यांनी ३० लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारं असल्याचं आरोप राम शिंदेंनी केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. मात्र असंच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार- खासदार होतील, असा टोला राम शिंदेंनी लगावला आहे.दरम्यान, राम शिंदेनी केलेल्या या टीकेवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेच्या शपथविधीसाठी राज्यभरातील ४०० शेतकऱ्यांना निमंत्रण

News Desk

दोन्ही समाजाने शांतता राखावीः शरद पवार यांचे निवदेन

News Desk

अजित पवारांनी केलं नव्या CBI संचालकांचं कौतुक ! महाविकासआघाडीसोबत झाले होते मतभेद

News Desk